जयहिंद बाल सशक्तीकरण

मुलांचा विकास म्हणजे त्याच्या किशोर वयापर्यंतची जडणघडण होण्याची प्रक्रिया. लहानपणी तो इतरांवर अवलंबून असतो तिथपासून ते त्याच्या सामाजिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासासाठी सुरुवातीची काही वर्षे जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे. मुलांना भाषा ऐकण्याची, वापरण्याची संधी मिळाल्यास ती अधिक प्रगल्भ होऊ शकतात यातून ते वेगवेगळी कौशल्ये मिळवू शकतात. जयहिंद चळवळीने बाल सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे आणि विविध प्रकल्पांचे आयोजन करत आहे.

  • बाल संस्कार वर्ग
  • चित्रकला स्पर्धा
  • मुलांसाठी ग्रंथालय
  • अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन.

शिक्षण म्हणजे तथ्ये शिकणे नाही तर मनाला विचार करायला प्रशिक्षित करणे आहे याचे प्रशिक्षण आहे. -अल्बर्ट आइनस्टाईन