जयहिंद सुदृढ ग्राम योजना

भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे. आजही निम्म्यापेक्षा जास्त लोक खेड्यांमध्ये राहतात. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या विकासासाठी महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा मूलमंत्र दिला. त्यांना समृद्ध व स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना समाजात रुजवायची होती. खेडी स्वयंपूर्ण व स्वावलंबी झाली तरच देश समृद्ध होईल. आज शहरीकरण झपाट्याने वाढल्याने शहरांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून खेडे जर विकसित झाले तर शहरांकडे जाणारा प्रवाह थांबेल.

जयहिंद लोकचळवळीचा "सुदृढ ग्राम" हा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. श्री. अण्णा हजारे व श्री. पोपटराव पवार यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक गाव आदर्श झाले पाहिजे अशी जयहिंदची संकल्पना आहे. सध्या बारा गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे व त्यामध्ये खालील उपक्रम घेतले जातात :

  • गावाचा विकास आराखडा तयार केला जातो.
  • समाजातील सर्व घटकांचा सुकाणू समितीमध्ये सहभाग आहे.
  • केंद्र शासन, राज्य शासन तसेच अन्य सामाजिक संस्था यांच्या विकासात्मक योजना राबविणे.
  • जयहिंद लोकचळवळीचे सर्व विभाग त्या गावात उपक्रमशील असतात.
  • पाणलोट विकास कार्यक्रम व अन्य जलसंधारण उपायांद्वारे शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाते.
  • सी.एस.आर व अन्य मार्गांनी निधी उपलब्ध केला जातो.
  • शहरातील सर्व सोयी सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देतात.
  • निकोप समाज निर्मितीसाठी अखंड हरिनाम सप्ताह व व्याख्यानांच्या माध्यमातून अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवला जातो.
  • पडीक जमिनीवर बहुपयोगी वृक्षांची लागवड केली जाते.
  • विवाह समारंभावर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.
  • ‘स्वच्छ व सुंदर गाव’ ही संकल्पना राबविली जाते.

भारताचे भविष्य त्याच्या खेड्यातच आहे - महात्मा गांधी