जयहिंद लोकचळवळ अंतर्गत व दंडकारण्य अभियाना मार्फत 'वृक्ष लागवड योजना 2021'

जयहिंद लोकचळवळ अंतर्गत व दंडकारण्य अभियाना मार्फत 'वृक्ष लागवड योजना 2021' ------------------------------------------- महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ अंतर्गत व दंडकारण्य अभियाना मार्फत 'वृक्ष लागवड दरवर्षी केले जाते. तसेच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी ही गावांतील व्यक्तीस दिली जाते. जयहिंद लोकचळवळ ने दत्तक घेतलेल्या 12 गावांमधील प्रामुख्याने आंबी खालसा, घारगाव, बोटा, कुरकूटवाडी, कुरकुंडी व अकलापूर या 06 गावांमध्ये वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन राबवले. यावेळी प्रामुख्याने संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.सौ.दुर्गाताई तांबे, जि.प. अ.नगर चे सदस्य मा.अजय फटांगरे, जयहिंद सुदृढ ग्रामचे विभाग प्रमुख अ‍ॅड. सुहास आहेर, कृषी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.अभय जोंधळे आदींसह त्या गावातील सरपंच, उपसरपंच तसेच गावकरी ही यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले. #jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ