कृषी विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त एकात्मिक शेती पद्धती या विषयावर परिसंवाद !

जयहिंद लोकचळवळ अंतर्गत कृषी विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त एकात्मिक शेती पद्धती या विषयावर डॉ.उल्हास सुर्वे (विभाग प्रमुख एकात्मिक शेती महात्मा फुले कृषी विद्यापीठ) व डॉ. अशोक कडलग (निवृत्त माती परीक्षण शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ) यांचे मार्गदर्शन, परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे, प्रगतशील शेतकरी व पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत रहाटळ, जयहिंद सुदृढ ग्राम विभागप्रमुख ऍड सुहास आहेर, जयहिंद लोकचळवळ प्रमुख समन्वयक संदीप खताळ, जयहिंद कृषी विभागप्रमुख डॉ.अभय जोंधळे तसेच जयहिंदचे इतर विभागप्रमुख, जयहिंद सुदृढ ग्राम अभियानातील पथदर्शी प्रकल्पासाठी निवडलेल्या 12 गावातील सरपंच व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. #जयहिंद_लोकचळवळ जागर लोकशाहीचा, निर्धार तरुणांचा, संकल्प सुदृढ समाजाचा !